कोलकात्यातील डॉक्टरांना मारहाणीच्या निषेधार्थ जळगावात निदर्शने

0

जळगाव  ।  कोलकाता शहरातील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील दोन डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ देशभरातील निवासी डॉक्टर आज संपावर आहेत. दरम्यान या घटनेचा निषेध करण्यासाठी येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला.

कोलकाता येथील एन. आर. एस. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हृदयरोग विभागात सेवा देणारे निवासी डॉक्टर परिभा मुखर्जी आणि डॉ. यश टेकवानी या दोन डॉक्टर्सला रूग्णाच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ देशभरातील निवासी डॉक्टर आज संपावर असून निदर्शने करण्यात येत आहेत.  या अनुषंगाने इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) जळगाव शाखेतर्फे आज जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे असणारे निवेदन देण्यात आले. यात भविष्यात या प्रकारच्या घटना न व्हाव्यात यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी दोषी असणार्‍यांवर कठोर कार्यवाही करावी, अन्यथा उपोषणासह हे आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारादेखील या निवेदनात देण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.