कोलकाता :- भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या मंगळवारी झालेल्या “रोड शो’ वेळी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभुमीवर त्यावरून भाजप आणि तृणमूलमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असून ही मूर्ती तृणमूलच्या गुंडांनी फोडली असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला होता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यावर मोदींना थेट जेलमध्ये टाकण्याची धमकी दिलीय. तर ही मूर्ती भाजपच्याच कार्यकर्त्यांनी फोडली असा दावा ममता बॅनर्जी यांनी केलाय.
ममता म्हणाल्या, बंगालची जनताच आता विद्यासागर यांची मूर्ती बनवून देईल. हिंसाचारात ज्या महाविद्यालयाचं नुकसान झालं ते 200 वर्ष जुनं होतं. त्याची भरपाई भाजप करून देणार आहे का? असा सवाल त्यांनी केला. ही मूर्ती तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी फोडली असेल तर ते आरोप सिद्ध करा नाही तर तुम्हाला आम्ही जेलमध्ये घेऊन गेल्याशीवाय राहणार नाही असा इशाराच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना दिला.