कोलंबो पुन्हा एकदा बॉम्बस्फोटानं हादरल; मोटारसायकलवर आढळली स्फोटकं

0

कोलंबो : श्रीलंकेची राजधानी कोलंबो शहर आत्मघाती साखळी बॉम्बस्फोटाने हादरले असताच आज पुन्हा एकदा बॉम्बस्फोटानं हादरल आहे.

कोलंबोमध्ये सिवोय सिनेमाजवळ बुधवारी सकाळी एक स्फोट झालाय. विस्फोटकं मोटारसायकलवर ठेवण्यात आली होती. या स्फोटात अद्याप कुणीही जखमी झाल्याची अथवा मृत झाल्याची माहिती नाही.

जगभरात ईस्टर संडे साजरा होत असतानाच श्रीलंकेची राजधानी कोलंबो शहरामध्ये एकापाठोपाठ आठ साखळी बॉम्बस्फोटात आत्तापर्यंत तब्बल ३२१ जणांना आपले प्राण गमवावे लागले असून, ५०० हून अधिक जण जखमी झाले आहे. या प्रकरणी २४ संशयित व्यक्तींना अटक करण्यात आली होती. या साखळी बॉम्बस्फोटाची जबाबदारी जबाबदारी आयसीस या दहशतवादी संघटनेने स्वीकारल्याचे वृत्त आहे.

जगभरात ईस्टर संडे साजरा होत असतानाच श्रीलंकेची राजधानी कोलंबो शहरामध्ये एकापाठोपाठ आठ साखळी बॉम्बस्फोटाची जबाबदारी जबाबदारी आयसीस या दहशतवादी संघटनेने स्वीकारल्याचे वृत्त आल्यानंतर लगेचच चर्चमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट करणाऱ्या सुसाइड बॉम्बरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.