जळगाव । प्रतिनिधी
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काल 8 एप्रिल रोजी कोरोना संशयित म्हणून 15 व्यक्तींचे स्वॅब नमुने घेऊन ते तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले होते.
औरंगाबाद येथून प्राप्त झालेल्या अहवालानुसार या 15 व्यक्ती पैकी 14 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये तीन/चार/पाच महिन्याच्या बाळांचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.