कोरोना संकटकाळात आ. चव्हाणांनी आपल्या कार्याची छाप उमटवली ; पोपट तात्या भोळे

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) :  काम करण्यासाठी वयाची नाही तर हिंम्मतीची गरज असते. अभूतपूर्व अश्या कोरोना संकटात अनेक लोकप्रतिनिधी घरात बसलेले असताना चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जनतेच्या सेवेचे जे कार्य केले ते निश्चितच कौतुकास्पद असून अगदी कमी वयात लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपल्या कामाची छाप चाळीसगावकर जनतेच्या मनात पाडली आहे. म्हणून त्यांचा जामडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेला कोरोना योद्धा म्हणून सत्कार सार्थ असल्याची भावना जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे यांनी व्यक्त केली.

चाळीसगाव तालुक्यातील जामडी येथे कोरोना महामारी काळात ज्या योद्ध्यांनी कोरोणा बरोबर संघर्ष केला व कोरोणा रुग्णांना मदतीचा हात दिला, त्यांचे मनोधैर्य वाढवले अशा कोरोना योध्याचा सत्कार करून सन्मान करण्यात आला.

संघर्ष प्रतिष्ठान व दिपकसिंग राजपूत मित्र मंडळाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम सर, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील पैलवान, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुनील पवार आदी उपस्थित होते. कोरोना योद्धे म्हणून ज्यांचा सन्मान करण्यात आला त्यात तालुक्याचे आमदार मंगेश रमेश  चव्हाण, प्राध्यापक सुनील निकम, डॉक्टर हर्षदा पाटील, डॉक्टर सुजाता राजपूत,पो.पाटील. सोनल रायसिग परदेशी, विजय दाभाडे mpw,अंगणवाडी सेविका दीपमाला जेवरास,अंगणवाडी सेविका आश्विनी लक्षमण परदेशी, आशासेविका वैशाली किशोर पाटील, मदतनिस साजिदा बी शेख अनवर, मदतनिस जिजाबाई रामसिंग ठाकरे, प्रा शिक्षक दाभाडे सर, उर्दू शाळेतील शिक्षक रऊफसर यांचा समावेश होता.

सत्काराला उत्तर देताना आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की कोरोनाच्या सुरुवातीच्या ३ महिन्यात आपण त्याचा शिरकाव तालुक्यात होऊ दिला नाही मात्र चाळीसगाव तालुक्यातील पाहिले रुग्ण हे जामडी गावात त्यातल्या त्यात माझ्या जवळच्या मित्राची आई पॉझिटिव्ह निघाल्यानंतर मनात थोडी भीती निर्माण झाली मात्र नंतर मी विचार केला की जर आपणच कोरोनाला भीत घरात बसलो तर ज्या विश्वासाने आपल्याला लोकांनी आमदार म्हणून निवडून दिले आहे त्यांच्या विश्वासाशी ती प्रतारणा ठरले म्हणून मी जनतेचया सेवेसाठी २४ तास फिल्डवर राहण्याचा निर्णय घेतला. माझ्या तालुक्यातील प्रत्येक रुग्ण हा माझ्या कुटुंबातील सदस्य आहे या भावनेने महानगरातील खाजगी रुग्णालयाला लाजवेल असे सर्व सोयीसुविधा युक्त कोविड सेंटर आपण सुरू केले.

जामडी गावाशी माझे जुने ऋणानुबंध असून मी जेव्हा २०१२ मध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारी केली तेव्हा या गावाने खूप मोठा पाठिंबा मला दिला होता अश्या आठवणींना उजाळा त्यांनी दिला. आजचा सत्कार हा कुटुंबातील सत्कार असून यामुळे काम करण्याची नवी ऊर्जा मिळाली आहे. येणाऱ्या काळात शक्य त्या माध्यमातून जामडी गावाच्या विकासासाठी सहकार्य करणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

प्रा.सुनील निकम सर व संजय भास्करराव पाटील यांनी मनोगतातुन कोरोना लॉकडाऊनच्या काळात आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पक्षाच्या वतीने चाळीसगाव तालुक्यातील जनतेसाठी दररोज २००० गरजूंना सकाळ संध्याकाळ अन्नसेवा, तालुक्यातील १ लाख कुटुंबाना आर्सेनिक अल्बम औषधी वाटप,  गावागावात फवारणी, बाहेरगावी अडकलेल्या नागरिकांना इ पास काढून देणे आदी माध्यमातून केलेल्या उपक्रमांचा आढावा मांडला. संजय भास्करराव पाटील यांनी सांगितले की कोरोना काळात आपले कार्यालय एकही दिवस बंद न ठेवणारे आमदार आपल्या तालुक्याचे असून त्याचा आपल्याला अभिमान आहे. कोरोना संपला नसून सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असेही त्यांनी सांगितले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद गोपालसिंग परदेशी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघर्ष प्रतिष्ठान दिपकसिग राजपूत, शरीफ शेख फकीरा, विजय हरी परदेशी, विजय हरी चुगडे, विश्वास फुलचंद परदेशी, भगवान रघुविरसिग परदेशी, नंगीनचंद नेमीचंद बेदमुथा, विठ्ठल शंकर परदेशी

रामधन शिवलाल परदेशी, रनजित चुगडे, सुभाष वाणी, भैय्या जाधव, रायसिग परदेशी, संजय परदेशी, जाबीर कुरेशी, लुकमान शहा, राजु शंकर परदेशी, बाजीराव पाटील, आप्पा पाटील, युसूफ शेख, अरुण जाधव, प्रदिप परदेशी, देवसिग परदेशी, शामसिग राजपुत यांनी परिश्रम घेतले

Leave A Reply

Your email address will not be published.