अमळनेर(प्रतिनिधी) व्यापारी,व्यावसायिक व नागरिकांना कळविण्यात येते की,अमळनेर नगरपरिषदेकडे पाणीपुरवठा विजदेयके थकबाकी,बिगरसिंचन पाणीपट्टी व आवर्तन,कर्मचारी वेतन व निवृत्ती वेतन धारकांचे देयक तातडीने देणे आवश्यक असल्याने अमळनेर नगरपरिषद अमळनेर मालकीच्या न.पा.शाळा क्र.5 मधील अंतिम भूखंड क्र.77,78 मधील चा कै.देवाजी बुधा महाजन व्यापारी संकुलातील दुकानांचा जाहीर लिलाव कोरोना महामारीचे संकट टाळण्यासाठी सर्वच बंद करण्यापेक्षा आपणच मास्क,सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग या त्रिसूत्रीच्या निर्बंधांचे पालन करून दिनांक 8 मार्च 2021 रोजी स्थळ नगरपालिका मालकीचे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह अमळनेर येथे खालील प्रमाणे टप्प्या टप्प्याने ठेवण्यात आलेला आहे
सकाळी 11.30 ते 12.00 अंध अपंगांसाठी राखीव दुकानांचा लिलाव होईल
दुपारी 12.00 ते 12.30 अनु.जाती/अनु.जमाती/भटके विमुक्तांसाठी राखीव दुकानांचा लिलाव होईल
दुपारी 12.30 ते 2.00 सर्वसाधारण दुकानांचा लिलाव होईल.
लिलाव धारकांसाठी खालील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत
1)ज्या व्यक्तीच्या नावे सुरक्षा अनामत पावती असेल फक्त त्याच व्यक्तींना कोरोना एंटीजन चाचणी केल्यानंतरच नाट्यगृहात तिला साठी प्रवेश देण्यात येईल
2) लिलाव प्रसंगी उपस्थित होताना प्रत्येकाने मास्क लावणे व सुरक्षित अंतर पाळणे बंधनकारक राहील
3)लिलावाच्या ठिकाणी शांतता पाळण्यात यावी व अनावश्यक गर्दी करणे टाळावे
4)दिनांक 8 मार्च 2021 या दिवशी सोमवार असल्याने नो व्हेईकल डे आहे त्यामुळे नाट्यगृहाच्या आवारात व समोर रस्त्यावर कोणतेही वाहन आणण्यास लावण्यास मनाई आहे.
5)लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तींनी नाट्यगृहात नेमून दिलेल्या जागेवरच बसणे बंधनकारक राहील
6)लिलाव प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येईल
7)तसेच कोरोना संदर्भातील शासनाचे सर्व नियम व अटी लागू राहतील
कोरोना संदर्भात सर्व नियमांचे पालन करत लिलाव प्रक्रिया पार पडेल असे नरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांनी कळविले आहे.