कोरोना व्हायरस रोखण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे व्यापक उपाय सुरु

0

भुसावळ | प्रतिनिधी

कोरोना व्हायरस (कोविड -१९) संसर्ग रोखण्यासाठी मध्य रेल्वेने व्यापक उपाय सुरु  केले आहेत. कोरोना कोविड-१९ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यासाठी मध्य रेल्वेने संपूर्ण यंत्रणा तयार केली आहे. मध्य रेल्वेवरील सर्व स्तरांवर या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. यासाठी  नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आलेली आहे आणि कर्मचार्‍यांना या विषयाबद्दल संवेदनशील आणि शिक्षित केले गेले आहे. संबंधित आरोग्य अधिकार्‍यांचे सहकार्य आणि समन्वय देखील सुनिश्चित केला जात आहे.  कोरोना व्हायरस (कोविड -१९) संसर्ग रोखण्यासाठी मध्य रेल्वेने  कारवाई केली असून यामध्ये  रेल्वे स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये कोरोना व्हायरस (कोविड -१९) संबंधी माहिती, शिक्षण आणि संप्रेषण (आयईसी) संबंधी साहित्य (पोस्टर्स आणि पत्रके) सामान्य जनजागृतीसाठी स्पष्टपणे दर्शविली आहेत. जनजागृती करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर ऑडिओ व व्हिडीओ क्लिप्स दाखविल्या जात आहेत. स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये उदघोषणा केल्या जात आहेत.
भायखळा, कल्याण, भुसावळ, सोलापूर, नागपूर आणि पुणे येथील रेल्वे रूग्णालयांना कोरोना विषाणूच्या संशयास्पद घटनांचा उपचार करण्यासाठी आवश्यक व संरक्षणात्मक उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी वेगळे वॉर्ड उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. वैद्यकीय कर्मचार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत की कोरोना विषाणूच्या आजाराचा  कोणताही संशयीत रूग्ण आढळल्यास अथवा नोंदवले गेल्यास तातडीने रेल्वे रूग्णालय / आरोग्य युनिटमध्ये तसेच त्या बाबतीत रेल्वे बोर्ड व स्थानिक आरोग्य अधिका-यांना कळविण्यात यावे. रुग्णालयातील सर्व वैद्यकीय प्रभारींना संबंधित राज्य अधिका-यांशी सतत संपर्क ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशा राज्य अधिका-यांनी सुचविलेले या विषयावरील मार्गदर्शक सूचना व अद्यतने मिळवून आवश्यक शोध, प्रतिबंध व उपचारात्मक उपाय करावेत.
ई. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब वगैरे सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर तसेच प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारेही याबाबतीत जनजागृती केली जात आहे. तसेच  स्टेशन कर्मचार्‍यांना तातडीने आवश्यक कारवाईसाठी कोरोना व्हायरस (कोविड -१९) विषयी जागरूक केले गेले आहे.

एकत्रितपणे आम्ही कोरोना विषाणूंविरूद्ध लढू शकतो  कोरोना व्हायरस (COVID-19) चा प्रसार थांबवा !! स्वतःचे आणि इतरांचे रक्षण करा !! असे संदेश फलक लावण्यात येणार असून  24×7 कंट्रोल रूम नंबर + 91-11-23978046 वर कॉल करा किंवा ncov2019@gmail.com वर ईमेल करा. असे आवाहन करण्यात आले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.