कोरोना वॅक्सिनचे दोन डोस घेणं अत्यंत आवश्यक – पंतप्रधान नरेंद्र मोदी

0

 नवी दिल्ली : आजपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेशी संवाद साधत आहेत.करोना वॅक्सिनचे दोन डोस घेणं अत्यंत आवश्यक असल्याचे, यावेळी त्यांनी आवर्जुन सांगितले.

मोदी म्हणाले, ज्याला कोरोना लशीची जास्त गरज त्याला प्राधान्याने कोरोना लस मिळणार आहे. आरोग्य कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, पोलीस यांच्या लसीकरणाचा खर्च भारत सरकार उचलणार आहे. तसेच तुम्हाला पहिलं लसीकरण झाल्यानंतर दुसरा डोस कधी मिळणार याची माहिती तुमच्या फोनवर दिली जाणार आहे.

कोरोना वॅक्सिनचे दोन डोस घेणं अत्यंत आवश्यक आहे. पहिला डोस घेतला व नंतरचा डोस घेणं विसरले, अशी चूक करू नका. जसे की तज्ज्ञं सांगत आहेत, पहिल्या व दुसऱ्या डोसमध्ये जवळपास एक महिनाचे अंतर ठेवले जाईल. तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचं आहे, दुसरा डोस घेतल्याच्या दोन आठवड्यानंतरच तुमच्या शरिरात करोनाच्या विरोधात लढण्यासाठीची आवश्यक प्रतिकारशक्ती निर्माण होईल. त्यामुळे लसीकरण होताच तुम्ही बेजबाबदारपणे वागायला लागला, मास्क काढून ठेवलं, सुरक्षित अंतर ठेवणं विसरलात…तर काही उपयोग होणार नाही. मी विनंती करतो की असं करू नका.”

Leave A Reply

Your email address will not be published.