कोरोना विरुद्धच्या लढाईत प्रशासनाच्या सोबतीला स्मितोदयचाही हातभार

0

अमळनेर (प्रतिनिधी)- शहर व ग्रामिण भागात कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवून अतोनात प्रयत्न करीत असताना या लढाईत सामाजिक संस्था व जनतेनेही सहकार्य अपेक्षित असल्याने माजी आमदार स्मिता वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली स्मितोदय फाऊंडेशनने शहर व ग्रामिण भागातील हॉटस्पॉट क्षेत्र सॅनिटायझेशन करून निर्जंतुकीकरण करण्याचा विडा उचलला आहे.

जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालिका सौ भैरवी वाघ पलांडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात असून सामाजिक कार्यासाठी निर्माण झालेल्या स्मितोदय फाऊंडेशनच्या माध्यमातून आणि भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या अनमोल सहकार्याने ही निर्जंतुकीकरण मोहीम सुरू झाली आहे.

अमळनेर शहर आणि तालुक्यात काही दिवसांपासून कोरोनाने अक्षरशः कहर केला असून दररोज अनेकांचे बळी जात असल्याने अनेक कुटुंबाचे आधारस्तंभ हरपत आहेत,शहरात अनेक प्रभागात कोरोना बधितांसह बळींची संख्या प्रचंड असून ग्रामिण भागात अनेक गावांमध्ये अशीच भयावह परिस्थिती आहे.कोरोनाला रोखण्यासाठी मास्क,सॅनिटायझेशन आणि सामाजिक अंतर ही त्रिसूत्री महत्वाची आहे,मागील वर्षी पहिल्या लाटेत न प प्रशासनाने व काही सामाजिक संस्थांनी शहर व ग्रामिण भागात बाधित क्षेत्रात सॅनिटायझेशन करून हा भाग निर्जंतुक करण्याचा प्रयत्न केला होता,मात्र आता दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या झपाट्याने वाढून प्रशासनाची देखील दमछाक होत असल्याने निर्जंतुकीकरणाकडे दुर्लक्ष झाले आहे.हीच बाब सौ भैरवी वाघ पलांडे यांनी लक्षात घेऊन निर्जंतुकीकरणाचा विडा स्मितोदय फाऊंडेशनच्या माध्यमातून उचलला आहे.

शहर व ग्रामिण भागात स्वतंत्र ट्रॅक्टर

सदर निर्जंतुकीकरण मोहिमेसाठी शहर व ग्रामिण भागात दोन स्वतंत्र मिनी फवारणी ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली असून सौ भैरवी वाघ या स्वतः कार्यकर्त्यासमवेत प्रत्येक ठिकाणी पोहोचून काळजीने फवारणी करून घेत आहेत,शहरात प्रभाग क्रमांक 1 मधील तांबेपुरा, अयोध्या नगर,केशव नगर,रामवाडी, बंगाली फाईप परिसरात सुमारे 20 पेक्षा अधिक बळी गेल्याने त्या भागातून फवारणीस सुरुवात करण्यात आली.सदर योगदानाबद्दल या भागाचे नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी स्मितोदय फाऊंडेशन चे आभार व्यक्त केले.यानंतर शहरात ज्या प्रभागात किंवा ग्रामीण भागात ज्या गावात सर्वाधिक मृत्यू अथवा कोरोना बधितांची संख्या अधिक असेल त्याभागात सॅनिटायझर फवारणीस प्राधान्य दिले जात असून आतापर्यंत अनेक प्रभाग व अनेक गावांत निर्जंतुकीकरण पूर्ण झाले आहे,अजूनही उर्वरित ठिकाणी ही मोहीम राबविण्यात येत आहे.विशेष म्हणजे अनेक भागातील नागरिक व ग्रामीण भागातील ग्रामस्थ स्वतः भैरवी पलांडे अथवा स्मिता वाघ यांना फोन करून या मोहिमेचे कौतुक करण्यासह आमच्याकडेही फवारणी करून घ्या अशी मागणी करीत आहेत,टप्प्याटप्प्याने जास्तीतजास्त भागात निर्जंतुकीकरण केले जाईल अशी ग्वाही भैरवी वाघ पलांडे या अनेकांना देत आहेत.

सदर मोहिमेसाठी भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शहराध्यक्ष उमेश वाल्हे,प स चे माजी सभापती श्याम अहिरे,प्रफुल्ल पवार,श्रीमती रेखा पाटील,माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील,सरचिटणीस जिजाबराव पाटील,राकेश पाटील,बबलू राजपूत,उपाध्यक्ष महेंद्र महाजन,निवास मोरे ,मॅचिंद्र आण्णा पाटील ,सदा बापू राजपूत,चंद्रकांत कंखरे,ऍड रमाकांत माळी,माजी नगरसेवक विठोबा महाजन,माळी समाजअध्यक्ष गंगाराम महाजन,प्रकाश महाजन,योगेश पाटील,देवा लांडगे,पंकज भोई,किसान मोर्चा दिपक पवार,मुन्ना कोळी, रावसाहेब पाटील,राहुल चौधरी, समाधान पाटील,सौरभ पाटील,निखिल पाटील,प्रवीण महाजन,सोनू बडगुजर, विजय महाजन,हर्षल महाजन आदींचे सहकार्य स्मितोदय फाऊंडेशनला लाभले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.