Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»कोरोना लस घेतल्यानंतर २४ तासांत वॉर्डबॉयचा मृत्यू?
    ताज्या बातम्या

    कोरोना लस घेतल्यानंतर २४ तासांत वॉर्डबॉयचा मृत्यू?

    By January 18, 2021No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लखनऊ – उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये जिल्हा रुग्णालयात वॉर्डबॉय पदावर कार्यरत असणाऱ्या एका व्यक्तीचा  कोरोना लस घेतल्यानंतर २४ तासांत मृत्यू झाल्याचं समोर आलंय. महिपाल सिंह यांच्या मृत्यूमागे कोरोना लसीची कोणतीही रिअॅक्शन झाल्याचं समोर आलेलं नाही, असं डॉक्टरांनी म्हटलंय. दरम्यान, संबंधित व्यक्तीचा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे अद्याप अधिकृतरित्या समोर आलेले नाही. यासंदर्भातील वृत्त टाइम्स नाऊने दिले आहे.

     

    मृत्यू झालेल्या वॉर्डबॉयचे महिपाल सिंह  यांनी लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी शनिवारी लस घेतल्यानंतर त्याला लगेचच त्रास व्हायला लागला. नाईट ड्युटी संपल्यानंतर त्यांना छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे त्याचबरोबर कफचा त्रास जाणवू लागला. त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. महिपाल यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी त्यांचे शवविच्छेदन केले जणार असल्याचे उत्तर प्रदेशच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

     

    दरम्यान, दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले की, कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर ५१ जणांमध्ये नॉर्मल तर एकामध्ये गंभीर साईड इफेक्ट झाल्याचे दिसून आले. या २२ वर्षीय तरुणाची लस घेतल्यानंतर प्रकृती गंभीर झाल्याने त्याला एम्सच्या आयसीयूत दाखल करण्यात आले. तसेच कोलकात्यात एका ३५ वर्षीय नर्सला लस घेतल्यानंतर आयसीयूत दाखल करण्यात आले. यावर काही वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, लस घेतल्यानंतर प्रकृती बिघडण्याचे हे अॅलर्जीक रिअॅक्शनचे प्रकार असल्यामुळे लसींपासून त्यापासून घाबरण्याचे कारण नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif