कोरोना रुग्णांमध्ये देशातील टॉप १० शहरांमध्ये जळगावचा समावेश

0

नवी दिल्ली : देशात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज पत्रकार परिषदेत घेऊन महाराष्ट्र आणि पंजाबमधील वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. महत्वाची बाब म्हणजे देशात कोरोनामुळे सर्वात जास्त प्रभावित झालेल्या टॉप १० शहरांमध्ये एकट्या महाराष्ट्रातील ९ शहरांचा समावेश आहे. तर एक शहर कर्नाटकमधील आहे.  दरम्यान, महाराष्ट्रातील टॉप ९ शहरांमध्ये जळगावचा समावेश आहे.

जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणत वाढत आहे. मागील काही दिवसापासून हजाराच्या उंबरठ्यावर असणारी संख्या हजाराच्या वर जाऊ लागली आहे. त्यात मृत्यूचाही दर वाढला आहे. मागील काही दिवसापासून मृत्यू होणार्या रुग्णांची संख्या ११ ते १२ च्या घरात आढळून येत आहे.

दरम्यान, वाढत्या कोरोना संसर्गाने “महाराष्ट्रा आणि पंजाबमधील स्थिती अतिशय चिंताजनक असून महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत २८ हजाराहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर पंजाबमधील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत कोरोनाचा प्रसार होण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली आहे”, असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं.

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध?

केंद्र सरकारनं चिंता व्यक्त केल्यानंतर आता राज्य सरकार देखील अॅक्शन मोडमध्ये येऊन पुन्हा एकदा कठोर निर्बंध लादले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसे संकेतच याआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत राहिली तर लॉकडाऊन बाबत विचार केला जाईल. दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं आरोग्यमंत्र्यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.

कोरोना रुग्णांमध्ये देशातील टॉप १० शहरं कोणती?

पुणे

नागपूर

मुंबई

ठाणे

नाशिक

औरंगाबाद

बंगळुरू शहर

नांदेड

जळगाव

अकोला

Leave A Reply

Your email address will not be published.