Friday, August 12, 2022

कोरोना, म्युकरमायसिस, डेल्टा व आता ओमिक्रॉनशी लढा देतांना..

- Advertisement -

संपूर्ण जगात कोरोनाच्या दुष्प्रभावातून जो हाहा:कार उडाला त्याचे भय, भिती व धास्ती आजही कमी झाली आहे असे वाटत नाही. कोरोना काळात नको ती माणसं मृत्युमुखी पडली. कोरोनाचे नियम पाळूनही जे गेले ते मागे स्मृती ठेऊन गेलेत. वैद्यकीय सेवापेक्षा व्यवसायाभिमुख आजार बळावल्याने आरोग्य क्षेत्रातील अनेकांना कोरोना योध्दा म्हणून पदव्या बहाल करण्यात आल्यात.

- Advertisement -

कोरोनाची लाट ओसरते न ओसरते तोच म्युकरमायसिस आला यामुळे ठरावीक बाधीत लोकांना मात्र चेहरा, जबडा व दात, दाढा यामध्ये लाखे रुपये खर्च करुन कॅन्सर ग्रस्तांसारखं जीवन ते जगत आहेत. कोरोना नंतर उद्भवलेल्या आजारांना नवा ट्रेंड हे नाव पडलं. कोरोना वर मात करण्यासाठी कोव्हॅक्सीन,  यांच्या लसीकरणसाठी मोठाच दिलासा मिळाला. लसीकरणाचा वेग जसा जसा वाढला तस तसे कोरोनाचे भय समाजात कमी होऊ लागले.

- Advertisement -

- Advertisement -

कोरोना म्युकरमायसिस नंतर डेल्टाचं अनाकलनीय आगमन झालं. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, रशिया  या पाश्चिमात्य देशांमध्ये डेल्टाचा प्रभाव मोठया प्रमाणावर दिसून आला. भारतीय विमान सेवा प्राधिकरणाने आरोग्याबाबत आपली सर्व यंत्रणा झाडून पुसून पुन्हा सज्ज केली. ऑक्सीजन कमी पडणार नाही याचीही दखल घेण्यात आली. दवाखाने, बेडस्‌ ,आरोग्य कर्मचारी यांनीही दक्षता पाळून न्याय्य नैतिकतेने पुन्हा आपण सिध्द झालो आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न केला.

आज आपण डेल्टाशी लढण्यास सज्ज  आहोत. वरील सर्व आजारांवर मानवाने लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले की आपण दुरुस्त तंदुरुस्त आहोत ? आपणास आता कुठलीच बाधा नाही ? वा होऊ शकत नाही ? या सर्व प्रश्नांना पद्धतशीरपणे बगल देत गर्दी असो वा सभा समारंभातील भव्य दिव्यता यामध्ये काहीएक बिनधास्तपणे संचार करतांना दिसतात. लग्न, साखरपुडे, कवी संमेलने, साहित्यीक, उत्सव आदि समारंभांना मोठया प्रमाणावर बायका-पुरुष तरुण अबालवृध्दांची गर्दी झालेली दिसून येते. अजूनही केंद्रीय आरोग्य मंत्रालय व महाराष्ट्र शासनाने  काही दिशानिर्देश करण्याची गरज आहे …!

शत्रू समोरुन येतोय त्या आधीच आपण शस्त्रसज्ज  झालोत तर ? का त्याची घरात शिरेपर्यंत वाट पाहायची ? यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी आंतरराष्ट्रीय विमानतळे, सागरी समुद्र किनारे, राज्य देशाच्या सिमा यांनाच काटेकोर नियम प्रतिबंध व उपाययोजनांसाठी सर्व साधनांनी युक्त सज्ज केले तर देशाच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल उचलले गेले असे म्हणता येईल…!

चला काय होतंय, पुढचं पुढे पाहून घेऊ ? ही प्रवृत्ती व त्यातून समाजात आपण एक प्रकारची बेफिकीर वृत्ती अशी चपलखपणे पसरवितो हयामुळे कधी काळी  महाभयंकर आजाररुपी संकटाला तोंड द्यावे लागते मग पुढे चालून निर्माण होतात अनेक प्रश्न….?

रमेश जे. पाटील

आडगाव ता. चोपडा

मो. 9850986100

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या