मुंबई – मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे राहत असलेल्या मातोश्री परिसरात कोरोनाग्रस्त सापडल्याने एकाच खळबळ उडाली आहे. मातोश्रीच्या काही मीटर अंतरावर असणाऱ्या एका चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली आहे. या चहावाल्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अंगरक्षक, मातोश्रीवर बंदोबस्तासाठी असलेले पोलीस कर्मचारी, इतर कार्यालयीन कर्मचारी चहा पिण्यासाठी जात असल्यानं प्रशासनाची झोप उडाली आहे. मातोश्रीच्या काही मीटर अंतरावर असणाऱ्या एका चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त ABP माझा या मराठी वृत्त वाहिनीने दिलं आहे.
दरम्यान, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अंगरक्षक आणि कार्यालयीन कर्मचारी यांची तातडीने तापसणी होणार आहे. खबरदारी म्हणून मुख्यमंत्र्यांचे अंगरक्षक आणि कार्यालयीन कर्मचारी बदलले जाण्याचीही शक्यता आहे. मातोश्री परिसरात कर्तव्यावर असणारे बरेच पोलीस कर्मचारी या चहा विक्रेत्याकडे चहा पिण्यासाठी जात असत. १८० हून अधिक कर्मचारी मातोश्रीच्या या परिसरात कार्यरत असतात. या घटनेनंतर वरिष्ठ पातळींवरच्या हालचाली वाढल्या आहेत.