मुंबई : देशभरात करोना व्हायरसने थैमान घातला आहे. महाराष्ट्रात करोनावर उपचार घेत असलेल्या ६४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. संबंधित व्यकी मुंबईतील घाटकोपरला वास्तव्यास होती. यापूर्वीही देशात करोनाने दोन बळी घेतले होते. पहिल्या मृत्यूची नोंद कर्नाटकात झाली होती तर राजधानी दिल्लीत दुसऱ्या मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आता महाराष्ट्रात पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे.
संबधीत व्यक्तीला दुबईतून परतल्यानंतर करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं होतं. यामुळे त्यांना कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, आज सकाळी उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे भारतात करोनामुळे आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे.