भुसावळ (प्रतिनिधी)– भुसावळात कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आल्याचा पार्श्वभूमीवर जळगाव येथील जिल्ह्याधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज २७ एप्रिल सोमवार रोजी भुसावळात येवून पाहणी केली .त्यानंतर शासकीय विश्राम गृहामध्ये त्यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक घेण्यात आली.
शहरात दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले त्या पार्श्वभूमीवर शहरातील या दोघी भागात १४ दिवस बंदी असल्याने त्यांची व्यवस्था कशी करता येणार आहे तसेच कोरोना बाधित रुग्ण वाढल्यास त्यासाठी काय उपाय योजना करता येणार आहे. नागरिकांनी प्रशासनास वेळेवर यमाहिती देणे गरजेचे असून कोणीही सर्दी, खोकला ताप आणि डोकेदुखी, अशी लक्षणे लपवू नये .पेशंट यांनी स्वताहून पुढाकार घेवून तपासणी करावी असेही आवाहन यावेळी जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी केले आहे.तसेच कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी कोणत्या उपाय योजना व खबरदारी घेतली जाईल यावर चर्चा करण्यात आली.समता नगर व सिंधी कॉलनी भागात दोन कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहे. येथील नागरीकांना येणाऱ्या अडचणी यात भाजीपाला,किराणा, दूध , त्यांना घरपोच देण्याचा प्रयत्न करणार आहे.तसेच प्रांताधिकारी यांना शहराचे परिस्थितिनुसार निर्णय घेता येईल असेही यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले.बैठकीनंतर सर्व अधिकारी शहराची पाहणी करण्यासाठी गेले.
यावेळी बैठकीला पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने, तहसीलदार दिपक धिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ गजानन राठोड, मुख्याधिकारी कल्पना डहाळे, बाजार पोलीस स्टेशन निरिक्षक दिलीप भागवत,तालुका पोलीस स्टेशन निरिक्षक रामकृष्ण कुंभार, हर पोलीस स्टेशन निरिक्षक बाबासाहेब ठोंबे,मंडळ अधिकारी योगिता पाटील,तलाठी रत्नानी आदीं अधिकारी उपस्थित होते.