जळगावकरांच्या चिंतेत वाढ! ‘त्या’ संशयित मृत वृद्ध रुग्णाचा अहवाल पाॅझिटिव्ह
………सावधान अमळनेरकर

0

जळगाव । प्रतिनिधि

अमळनेर येथील दाम्पत्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून यातील महिलेचा मृत्यू झाला आहे तर तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत. यातच आता अमळनेरच्याच ७३ वर्षीय वृध्दाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. अमळनेर येथील दाम्पत्यानंतर जिल्हा
शासकीय वैद्यकीय रूग्णालयात एका वृध्दाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
संबंधित वृध्द व्यक्ती मध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याला दिनांक २० एप्रिल रोजी जिल्हा शासकीय वैद्यकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
संबंधित वृध्द व्यक्ती मध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याला दिनांक २० एप्रिल रोजी जिल्हा शासकीय वैद्यकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. रूग्णालयात दाखल करताच या वृद्धाचा मृत्यू झाला होता.
त्याची स्वब चाचणी करण्यात आली होती. आज पहाटे दीड वाजेच्या सुमारास याचा अहवाल प्राप्त झाला असून यात हा रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याची माहिती शासकीय वैद्यकीय रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बी. एस. खैरे यांनी दिली आहे. आता अमळनेर मध्ये चार कोरोना चे चार रुग्ण पॉझिटिव्ह आहेत तर यातील दोघांचा या पूर्वीचमृत्यू झाला आहे आणि दोघेजण उपचार घेत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.