Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»कोरोना काळात सेवा दिलेल्या पन्नास सेवानिवृत्त सैनिकांसह पत्रकारांचा पोलिस उपअधीक्षक कार्यालयातर्फे गौरव
    जळगाव

    कोरोना काळात सेवा दिलेल्या पन्नास सेवानिवृत्त सैनिकांसह पत्रकारांचा पोलिस उपअधीक्षक कार्यालयातर्फे गौरव

    By January 13, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा शहर व तालुक्यातील ५० सेवानिवृत्त सैनिकांनी कोरोना काळात मोफत सेवा दिली होती. या सैनिकांचे ऋण फेडण्यासाठी दि. १३ रोजी बुधवारी येथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयातर्फे कोरोना योद्धा व पत्रकार बांधवांचा प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात करण्यात आला.

    येथील पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे यांचे कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पाचोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाइस चेअरमन विलास जोशी, पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, सहाय्यक पोलिस निरिक्षक रविंद्र मोरे, गणेश चौबे, दत्तात्रय नलावडे, विकास पाटील, सेवानिवृत्त सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळु पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

    पाचोरा येथील पोलिस उपअधीक्षक कार्यालयातर्फे कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता मोफत सेवा देणाऱ्या माजी सेनिकांमधे बाळू पाटील, गणेश सोळुंखे, दिपक सांगळे, गजानन तेली, ज्ञानेश्वर सोनवणे, विनोद पाटील, दिपक फुलचंद पाटील, दत्तु खरे, युवराज पाटील, रतिलाल पाटील, किशोर पाटील, सुनिल खवले, दिपक तुळशीराम पाटील, अनिल सावळे, दिपक मधुकर पाटील, संतोष भिल, साहेबराव चित्ते, सुरेश सोनवणे, गिरीष पाटील, राजेश पाटील, शामसिंग परिहार, प्रमोद पाटील, रविंद्र पाटील, रविंद्र पवार, बापु बडगुजर, विजय पाटील, विजय बोरसे, शांताराम शिंदे, भगवान पाटील, रविंद्र सुर्यवंशी, निवृत्ती पुंड, रविंद्र पाटील, नंदकिशोर पाटील, सौमित्र पाटील, मधुकर पाटील, रविंद्र कोकने, समाधान पाटील, रविंद्र धनराज पाटील, महेंद्र गाढवे, अनिल पाटील, रविंद्र वाघ, शशिकांत सोनवणे, किशोर पाटील, रांगोळीच्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या सुवर्णा पाटील, सरोज गोसावी सह विविध वृत्तपत्रांचे तथा इलेक्ट्रानिक्स मेडिया प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला. याकामी शकील शेख, रविंद्र दातीर, मुकुंदा पाटील यांनी सहकार्य केले. कार्यक्रमात पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, व्हाईस चेअरमन विलास जोशी यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचलन प्रा. सी. एन. चौधरी तर आभारप्रदर्शन पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील पाटील यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif