कोरोना काळात गावी आला आणि गाव कारभारी झाला

0

शेंदुर्णी, ता.जामनेर प्रतिनिधी: कोरणा काळात मेणगाव या आपल्या मुळ गावी चार महिने वास्तव्यास असलेल्या  गायक गणेश पाटील उर्फ पी .गणेश  यांनी गावात राहत असताना गावाचा कायापालट व्हावा या दृष्टीने रचना आखली परंतु निवडणुकीत उभे राहून कारभार हातात घेतल्याशिवाय शक्य नसल्याचे त्यांचे लक्षात आले ,नी गावातील जेष्ठ श्रेष्ठ व इतर सर्व तरुण यांचे मत विश्वासात घेऊन अपक्ष पॅनल उभे केले .समोर बलाढ्य राष्ट्रवादी व विद्यमान सरपंचासह भाजपचे पॅनल उभे होते, त्यांना टक्कर देत त्यांनी सर्वच्या सर्व आठ जागांवर विजय मिळविला .

एका  जागेवर नोटाला सर्वाधिक मते मिळून नोटाला पसंती देण्यात आली .सदर जागेवर सिने गायक गणेश यांचा उमेदवार तांत्रिक अडचणीमुळे रद्दबादल ठरला .त्या जागेवर भाजपचा उमेदवार निवडून येणार असे गृहीत होते  .मात्र ग्रामस्थांनी नोटाला 191 मध्ये व एका उमेदवाराला 104 व दुसऱ्या उमेददवाराला 102

मते देऊन त्याच ग्रामपंचायतीत नोटांचा वापर यशस्वी करून उभे असलेले उमेदवार नाकारले. जागेचा निर्णय राखीव असला तरी पुन्हा त्या जागेसाठी निवडणूक होण्याची शक्‍यता असल्याचे तज्ञांचे मत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.