कोरोना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना

0

जळगाव (प्रतिनिधी) ।  जगासह देशात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे़ हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे ‘जिल्हा बंदी’चे आदेश जारी करण्यात आले आहे़. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी कोरोना आजाराच्या उपचारासाठी खाजगी रुग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना केली आहे. यात महानगरपालिका क्षेत्र वगळण्यात आलं आहे.

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातील बहुतांश रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येत आहे. परंतु सार्वजनिक क्षेत्रातील रुग्णालयाची क्षमता आणि रुग्ण संख्येतील वाढ विचारात घेता कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी खाजगी रुग्णालयांचाही सहभाग घेणे महत्वाचे असल्याने या आजाराच्या उपचारासाठी खाजगी रुग्णालयामध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे.

विलगीकरण कक्षासाठी यांची करण्यात आली निवड
अपर जिल्हाधिकारी यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तर सदस्य – जिल्हा शल्य चिकित्सक, सदस्य -फिजिशियन, सदस्य – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रतिनिधी, सदस्य सचिव – जिल्हा अशी ही निवड करण्यात आली आहे.

सदर समितीने रुग्णालयाची तसेच कोरोना रुग्णांना दाखल करण्यात यावयाच्या ठिकाणांची पहाणी करुन संदर्भ 05 मध्ये दिलेल्या चेकलिस्टमध्ये माहिती भरावी आणि त्यांनतर रुग्णालयाला मान्यता देण्यात यावी.

१) मान्यता दिलेल्या रुग्णालयाने प्रथमत: उपलब्ध खाटा आणि व्हेंटीलेटरची संख्या नमूद करावी व त्यानंतर दरोजशासनाने दिलेल्या प्रपत्रामध्ये आणि Software मध्ये रुग्णाची माहिती देणे बंधनकारक राहील.

2) मान्यता दिलेल्या रुग्णालयाने कोविड-19 रुग्णांसंबंधी शासनाशी संपर्क ठेवण्यासाठी नोडल ऑफिसर यांची नेमणुक करुन त्यांचे नाव, संपर्क क्रमांक आणि E-mail address देणे बंधनकारक राहील.

3) कोव्हिड-19 च्या रुग्णांच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ झाल्यास सध्या उपलब्ध असणारी सार्वजनिक आणि मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयाची क्षमता कमी पडेल. असे झाल्यास प्रत्येक रुग्णास वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी खाजगी रुग्णालये अधिग्रहीत करणे आवश्यक आहे. यासाठी खालील प्रमाणे कार्यवाही करावी.

अ) बॉम्बे नर्सिंग होम अँक्ट नुसार नोंदणी केलेल्या सर्व रुग्णालयांची यादी करावी.

आ) सदर रुग्णालयात ICU कक्ष उपलब्ध आहे किवा नाही यानुसार दोन भाग करावेत

इ) सदर रुग्णालयांनी कोणत्याही डॉक्टर/ नर्स / तांत्रिक कर्मचारी / सपोट सर्व्हिस स्टाफ यांना रजा देऊ नये अशा सक्त सूचना दयाव्यात.

ई) आवश्यकतेनुसार जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने रुग्णालय अधिकगृहीत करण्याचे नियोजन तयार करण्यात येऊन किती रुग्ण आले तर कोणत्या रुग्णालयात ठेवण्यात यावेत याचा तपशीलवार तक्ता तयार करावा. यासाठी आयसीयु कक्ष असणाऱ्या रुग्णालयाचा प्रथम विचार करावा.

या समितीने कोरोना आजार उपचार आणि नियंत्रणासाठी उपरोक्त मार्गदर्शक सूचनांनुसार गांभीर्याने कार्यवाही करावी.

Leave A Reply

Your email address will not be published.