मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने आता कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मंदिरं खबरदारीसाठी बंद करण्यात येत आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी, पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर, शिर्डीचं साई मंदिर यासह राज्यातील सर्व मोठी मंदिरं बंद ठेवण्यात आली आहेत.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे मंदिर आज पहाटे 5 वाजता विधिवत पूजा करून भाविकांसाठी दर्शनासाठी बंद करण्यात आले. आजपासून देवीचे मंदिर सरकारचे पुढील आदेश येईपर्यंत बंद असणार आहे. तुळजाभवानी देवीची चैत्र पौर्णिमा यात्राही रद्द करण्यात आली आहे.
देवीचे मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी धार्मिक विधी आणि पूजा या महंत आणि पुजारी यांच्याकडून केल्या जाणार आहेत. कोरोना आजारामुळे गर्दी टाळण्यासाठी मंदिर संस्थानने हा निर्णय घेतला आहे.
राज्यातील कुठली मंदिरं बंद राहणार?
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर – पंढरपूर
साई बाबा मंदिर – शिर्डी
सिद्धिविनायक मंदिर मुंबई
गणपती मंदिर – गणपतीपुळे
अंबाबाई मंदिर – कोल्हापूर
तुळजाभवानी मंदिर – तुळजापूर
गजानन महाराज मंदिर – शेगाव
खंडोबा मंदिर – जेजुरी
मुंबादेवी मंदिर – मुंबई
एकविरा देवी – कार्ला
महालक्ष्मी मंदिर – सारसबाग
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर – पुणे
प्रभू वैद्यनाथा मंदिर – परळी, बीड
कसबा गणपती – पुणे
दत्त मंदिर – श्री क्षेत्र नृसिंहवाडी