भुसावळ (प्रतिनिधी)- मध्य रेल्वे प्रशासनाने करोना आजारावर मात करण्यासाठी जागरूकता मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. यामध्ये विविध घोषवाक्य असलेल्या भित्तिपत्रक, द्रुक-श्राव्य माध्यमातील स्लाईड्सचा समावेश आहे. यामध्ये लोकांना कोविड विषांणूपासून स्वतःचा बचावाबद्ल माहीती देणारे तसेच लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
● लक्ष द्या! दक्ष रहा, सुरक्षित रहा!
● करा बचाव स्वतःचा आणि आपल्या निकटवर्तीयांचा
ही काही घोषवाक्य लोकप्रिय ठरत आहेत. त्याचबरोबर खालील आवाहन असलेले संदेश सर्वसामान्यांना लसीकरण मोहीमेत सहभागी होण्यास प्रोत्साहन देणारे आहेत.
● लसीकरण करून घ्या, मास्क परिधान करा, कोरोना नियमांचे पालन करा.
● स्वच्छता, औषधे आणि कठोर शिस्त या त्रिसूत्रीने होईल कोरोनावर मात.
उपरोक्त भित्तिपत्रक व स्लाईड्स मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर व सोलापूर विभागातील विविध स्थानकांवर चिटकविण्यात/दर्शविण्यात आलेली आहेत. करोना आजारावर मात करण्यासाठी मध्य रेल्वे या जागरूकता मोहीमेसोबतच सातत्याने खालील आवाहन करीत आहे.
कृपया आपल्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड-१९ योग्य वर्तनचे अनुसरण करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येत आहे.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे