कोरोना आजारच पूर्णपणे फर्जीवाडा; कालीचरण महाराजांचा दावा

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

देशात  ओमायक्रॉनसंदर्भातील चिंता वाढत असतानाच दुसरीकडे आज सांगलीमध्ये कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी कोरोना  हा आजारच पूर्णपणे फर्जीवाडा असल्याचा दावा केलाय. इतकच नाही तर जागतिक आरोग्य संघटनेचे डॉक्टर, वैज्ञानिक आणि कर्मचारी हे फर्जी असल्याचंही ते म्हणालेत.

“कोरोना  हा फर्जीवाडा आहे. जागतिक आरोग्य संघटनासुद्धा फर्जीवाडा संस्था आहे. त्यांचे डॉक्टर, वैज्ञानिक आणि कर्मचारी हे फर्जी आहेत,” असं कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी म्हटलं आहे. “कोरोना हा भयानक महामारी नाही. ज्या कोरोनामुळे लोकांचा मृत्यू झाला त्या लोकांना डॉकटरांनी मारले आहे. किडनी आणि मानवी शरीरातील अवयवांची तस्करी झालेली आहे,” असा धक्कादायक आरोपही कालीपुत्र कालीचरण महाराजांनी केलाय.

“अमेरिकेत रेमडिसिव्हरवर बंदी आहे तर भारतात हे इंजेक्शन का दिले गेले, तसेच नंतर ते पण बंद पण करण्यात आले? करोना हे एक षड्यंत्र आहे,” असंही कालीपुत्र कालीचरण महाराज म्हणालेत.

“मोदीजींना मी धन्यवाद म्हणून इच्छितो कारण त्यांनी याच काळात राम मंदिर आम्हाला परत केले. ३७० हटवलं. शाहीनबाग उठवली. सीएए आणि एनआरसी लागू केली. या करोनाच्या सर्व काळात भारतातील लोक टिकले ते अध्यात्मावर आणि धर्मावरच्या विश्वासावर. नाहीतर बाकीचे देश कोसळलेले आहेत. मोदीजींना कोटी कोटी धन्यवाद आहेत. त्यांनी हा देश वाचवला,” अशी प्रतिक्रीया कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी दिली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here