कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द

0

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाचा ‘गुढीपाडवा मेळावा’ रद्द करत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. मनसे अधिकृत या ट्विटर हँडलवर याबाबत एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पत्रकात ”कोरोनाचं सावट गडद आहे त्यामुळे ह्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘गुढीपाडवा मेळावा’ रद्द करत आहोत”, असं म्हटलं आहे.


गेल्या काही दिवसांपासून मनसैनिक गुढीपाडवा मेळाव्यासाठी जोरदार तयारी करत होते. पण करोना व्हायरसचा प्रसार रोखायचा असेल तर, गर्दी टाळण आवश्यक आहे. मनसेच्या गुढीपाडव्याच्या सभेसाठी बैठका, मेळावे सुरु होते. त्यासाठी लोक एकत्र जमा होतात. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी यंदाचा गुढीपाडवा मेळावा रद्द करत आहोत असे मनसेने एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. महाराष्ट्रात करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या १९ वर पोहोचली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.