कोरोनामुळे कोसळलेला शेअर बाजार सावरला

0

मुंबई : कोरोना व्हायरलमुळे कोसळलेला मुंबई शेअर बाजार आज सावरला आहे. गुंतवणूकदारांच्या खरेदीने सेन्सेक्स आणि निफ्टीत वाढ झाली आहे.  सेन्सेक्स ५०० अंकांनी वधारला आहे, तर निफ्टीत ११५ अंकाची वाढ झाली आहे.

आजच्या सत्रात येस बँकेच्या शेअरमध्ये सर्वाधिक ३४ टक्के वाढ झाली आहे. येस बॅंकेवरील निर्बंध उद्या संध्याकाळपासून दूर होणार असून बँकेचे कामकाज पूर्वीप्रमाणे सुरु होणार आहे. दरम्यान, मुडीज या पत मानांकन संस्थेने येस बँकेला सकारात्मक मानांकन दिले आहे. त्यामुळे बँकेच्या शेअरची आज गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली. मागील ३ दिवसांत येस बँकेच्या शेअरमध्ये १०० टक्के वाढ झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.