नवी दिल्ली : देशात कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहे. यात आता अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कन्याकुमारी येथील काँग्रेसचे खासदार एच.वसंत कुमार यांचं ७० व्या वर्षी कोरोनामुळे निधन झालं आहे. १० ऑगस्टपासून त्यांच्यावर चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरु होते. शुक्रवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान, त्यांच्या या मृत्यूनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेता राहुल गांधी, तामिलनाडूचे मुख्यमंत्री आणि तामिलनाडूचे राज्यापाल यांच्यासह अनेक नेत्यांनी दुःख व्यक्त केलं आहे. वसंत कुमार दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवत ते पहिल्यांदाच खासदार झाले होते.
दरम्यान देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. करोनाबळींच्या बाबतमीत भारत जगात तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. भारताच्या आधी अमेरिका आणि ब्राझिल हे दोन देश आहेत.