Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी स्वताहून पुढे यावे ; माजी आ.दिलीपकुमार सानंदा
    महाराष्ट्र

    कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी स्वताहून पुढे यावे ; माजी आ.दिलीपकुमार सानंदा

    By July 19, 2020Updated:July 20, 2020No Comments32 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    खामगाव (प्रतिनिधी) : देशात व राज्यात कोरोनाचा कहर पहायला मिळत असून रुग्णांचा आकड़ा हा झपाट्याने वाढत आहे. एका बाजूला कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असतानां दुसऱ्या बाजूने रुग्ण बरे होण्याच प्रमाणदेखील वाढत आहेण् कोरोनाच्या ज्या रुग्णांना जास्त ऑक्सीजनची गरज होतीए अशांवर प्लाझ्मा थेरपीने राज्यात अनेक रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. एकदा प्लाझ्मा दानाने दोन गंभीर कोरोनाचे रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात. मध्यम आणि तीव्र रुग्णांकरिता प्लाझ्मा थेरेपी हे वरदान ठरत असून प्लाझ्मा दान करणारे हे देवदूत ठरत आहेण् म्हणून कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी देवदूत बनून प्लाझ्मा दान करण्यासाठी स्वताहून पुढे यावे असे, आवाहन माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केले आहे.

    याबाबत सानंदांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे कि, देशातील विविध रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन सरकारमार्फत केलं जात आहे. याच दरम्यान रुग्णसेवा करा आणि 2000 रूपये मिळवा अशी नवी योजना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सुरु केली आहे. प्लाझ्मा थेरपी ही कोरोनाग्रस्तांसाठी अनेक ठिकाणी फायदेशीर ठरत आहे. सरकारने प्लाझ्मा दान करणाऱ्यांना बक्षीस म्हणून 2000 रूपये देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्लाझ्मा दात्याला सरकार २००० रूपये देत आहे याची माहितीही नागरिकांना मोठ्या प्रमाणात होने गरजेचे आहे त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक जण पुढाकार घेतील.

    कोरोनाची तपासणी पॉजिटिव आल्यापासून २८ दिवसांच्या अलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्लाझमा दान करता येतो. ऐका वेळेस ४००.५०० मिली प्लाझ्मा येते. साधारण १५ दिवसांच्या अंतराने २.३ वेळेस प्लाझ्मा दान देता येते. प्लाझ्मा दान केल्याने कोणताही त्रास होत नाही ण् सध्या कोविड .19 विरोधक प्लाझ्मा बैग्ज़चा तुटवडा भासत आहे. प्लाझ्मा दानासाठी कोरोनामुक्त झालेल्यांनी समोर येणे गरजेचे आहे. त्याकरीता कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी देवदूत बनून प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि इतरांनाही पुढे आणावे असं आवाहन आवाहन माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या

    September 4, 2026

    आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन

    September 4, 2026

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif