Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत सहाय्यक व समुपदेशन केंद्र स्थापन
    जळगाव

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत सहाय्यक व समुपदेशन केंद्र स्थापन

    By June 26, 2020No Comments20 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
    जळगाव :- जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता स्थानिक पातळीवर शासकीय स्तरावरील सर्व अधिकारी व कर्मचारी कोरोना रोखण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत. कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण वाढतच असल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद, जळगाव येथे स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी सहाय्यक व समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
    या केंद्राचे उद्घाटन आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, समाजकल्याण समितीचे सभापती जयपाल बोदडे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, बी. ए. बोटे, डिगंबर लोखंडे आदि उपस्थित होते.
    या केंद्राची वेळ सकाळी 8.00 ते रात्री 8.00 अशी असून याकरीता नोडल अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या केंद्राचा संपर्क क्रमांक 0257-2224268 असा आहे. या दुरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधल्यास संबंधितांना माहिती मिळू शकेल. तसेच आपल्या अडचणी suvidha.zpjalgaon@gmail.com या संकेतस्थळावरही नोंदविता येतील.
    कोविड 19 अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही साधनांचा तुटवडा असल्यास, वैयक्तिक आरोग्य विषयक समस्या असल्यास, इतर अडचणी वा समस्या उद्भवल्यास किंवा काही शंका असल्यास त्वरीत समुपदेशन केंद्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री. बोटे यांनी केले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif