कोरोनानंतर चीनमध्ये ‘हंता’ नावाचा नवीन व्हायरस, एकाचा मृत्यू

0

 

बिजिंग : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून चीनमध्ये कोरानाग्रस्तांची संख्या आटोक्यात आली आहे. या व्हायरसला जन्माला घालणाऱ्या चीनमध्ये लोक सुटकेचा नि:श्वास सोडत नाहीत तोच आता नवीन व्हायरसने डोके वर काढल्याने चीनची झोपच उडाली आहे. 
करोना व्हायरसमुळे आतापर्यंत इटलीमध्ये अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. चीनला मागे टाकत इटलीमध्ये तब्बल ६ हजार जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, असे असले तरी देखील चीनच्या वुहानमधून नव्या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही, असे असताना आता चीनमध्ये एका नव्या व्हायरसने डोके वर काढले आहे. युन्नान प्रांतामध्ये एका व्यक्तीचा सोमवारी एका नव्या व्हायरसने मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती बसमधून प्रवास करीत होती. दरम्यान, त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या ३२ प्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली असल्याची माहिती चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.
हंता व्हायरस : करोनासारखाच हा व्हायरस असून हंता असे या व्हायरसचे नाव आहे. तसेच हा करोना व्हायरस सारखा घातक नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण करोना व्हायरस हवेद्वारे पसरतो. तर हंता हा व्हायरस उंदीर आणि खार यांच्या संपर्कात आल्यास होतो. जर एखादी व्यक्ती निरोगी असेल आणि ती व्यक्ती हंता व्हायरसच्या संपर्कात आल्यास याचे संक्रमण होते, असे सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने म्हटले आहे. हंता व्हायरस जीवघेणा असून याची लागण झाल्यास मृत्यूची शक्यता ३८ टक्क्यांनी असते. याची लक्षणे म्हणजे ताप, डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी, उलटी, डायरिया ही आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.