कोरोनाचे आणखी २ रुग्ण सापडले, महाराष्ट्रातील आकडा ४७ वर

0

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी दोन रुग्ण सापडले आहे. मुंबई आणि उल्हासनगरमधील प्रत्येकी एका महिलेला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.  त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या ४७ झाली आहे. या दोन्ही करोना रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मुंबईतील 22 वर्षीय महिला इंग्लंडवरुन परतली आहे.विमानतळावर तिची तपासणी करण्यात आली असता या महिलेला करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं. त्यामुळे या महिलेला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. त्याशिवाय मुंबईतील एका २२ वर्षीय तरुणीला करोनाची लागण झाली आहे. ही तरुणी ब्रिटनमधून आली होती. त्यामुळे तिच्यावरही विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या ४७वर पोहोचली असून देशातील करोना रुग्णांची संख्या १७१वर पोहोचली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.