शेंदुर्णी ता.जामनेर :
करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता करोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामस्थांनी सर्वानुमते शेंदुर्णीतील अत्यावश्यक दुकान वगळता सर्वत्र आज पासुन तीन दिवस बाजारपेठ बंद आहे.
आज बुधवार आठवडे असुनही सर्व व्यापारी बाजारपेठ बंद होती.नगरपंचायत, पोलीस प्रशासन, पत्रकार, व्यापारी असोसिएशनच व नागरिक यांच्या पुढाकाराने तीन दिवस शेंदुर्णीत बंद पुकारण्यात आला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात करोनाची लस देण्यात येत असुन नागरिकांचा यासाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल निकम यांनी सांगितले आहे.
तरी नागरिकांनी सोशल डिस्टिंशन पाळावे, वेळोवेळी हात धुवावेत, सँनिटायझर मास्कचा वापर करावा आपले आपल्या कुटुबाचे व गावाचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी व नगरपंचायतीस सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा सौ.विजया खलसे उपनगराध्यक्षा सौ.चंदाबाई अग्रवाल मुख्याधिकारी साजिद पिंजारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल निकम,पो.नि.राहुल खताळ पोउनि. किरण बर्गे तसेच व्यापारी असोसिएशन ,पत्रकार संघ शेंदुर्णी यांनी केले आहे