Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • वांगचुक यांच्या आंदोलनाने देशाला काय विचारायला भाग पाडले?
    • तब्बल २३.७४ लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश
    • कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच पक्षाचे अस्तित्व!
    • राज्यातील ‘एसआयआर’ला ‘इतक्या’ दिवसांची मुदतवाढ
    • बापरे! भरधाव ट्रेनने शाळेच्या व्हॅनला उडवले
    • सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा एकोणिसावा दिवस
    • ‘ईठा’वर विठाबाई नारायणगावकरांच्या कुटुंबाचा आक्षेप
    • किंनगाव बालहत्या प्रकरणात आजीला कोठडी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»कोरोनाचा भीतीदायक रेकॉर्ड! गेल्या 24 तासांत 1,84,372 नवे रुग्ण
    ताज्या बातम्या

    कोरोनाचा भीतीदायक रेकॉर्ड! गेल्या 24 तासांत 1,84,372 नवे रुग्ण

    By April 14, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे.  कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे.

    गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 1,84,372 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,027 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,38,73,825 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 1,72,085 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (14 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे एक लाख 84 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दीड लाखांच्यावर पोहोचला आहे.

    भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 13,65,704 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,23,36,036 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून ब्राझीलला मागे टाकत कोरोनाग्रस्त देशांच्या आकडेवारीत भारत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. देशात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा दर 90% टक्क्यापेक्षा कमी झाला आहे. अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विश्वविद्यालयाच्या (JHU) आकडेवारीनुसार, सर्वाधिक बाधित रुग्णांच्या बाबतीत भारतानेस ब्राझीलला मागे टाकलं आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 1,34,82,023 रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेत सर्वाधिक 3,11,98,055 रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत. तर, जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 13 कोटी 61 लाखांवर पोहोचला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    ढगांच्या ‌‘ऑफलाइन‌’ मोडमुळे शेतात सायलेंट मोड!

    July 14, 2026

    जळगावात भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान शिबीर

    July 14, 2026

    11 पुनर्वसित गावांच्या मालमत्ता नोंदींचा प्रश्न मार्गी!

    July 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif