जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाय योजना राबविले जात आहे. याच दरम्यान, आज महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहुळे तसेच माजी नगरसेवक नितीन लढ्ढा, दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया व सर्व पदाधिकारी ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी शहर वाहतूक शाखेचे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत दि. ३१ ऑगस्ट पर्यंत कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी विविध योजना ठरविण्यात आले आहे.
असे असणार नियम
१) सकाळी ११ वाजेपासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत कोणतेही वाहन दाणाबाजारात (खैरनार ऑप्टीकल ते सुभाष चौकमध्ये येणार नाही. यामध्ये छोटा हत्ती, पोयाजो, हात गाडी याच वाहनांना आत येण्याची परवानगी राहील.
२) दाणाबाजारात येणाऱ्या वाहने उदा. ४०७, मटोडोर व इतर वाहनांना पार्किंग करणेकामी – जुने बस स्थानक येथे जागा उपलब्ध करून देण्यात येईल, कॉंग्रेस भवन, सुभाष डेअरी समोरील रोड.
३) दाणाबाजारात संपूर्ण दिवसात हॉकर्स कोणत्याही प्रकारचे प्रवेश करणार नाहीत.
४) खैरनार ऑप्टीकलपासून ते सुभाष चौककडे जाणारा मार्ग हा एकेरी मार्ग राहील.
५) दाणाबाजारात सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत कोणतेही खाजगी वाहने दुचाकी, चारचाकी, तीन चाकी प्रवाशी रिक्षा यांना सुद्धा वरील वेळेत परवानगी राहणार नाही.
वरील सर्व सूचनांचे जे कोणी पालन करणार नाहीत त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.