कोरोनाचा कहर सुरूच ; २४ तासात देशभरात ८९ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद

0

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा संसर्ग काही केल्या कमी होत नाही. देशात करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील चोवीस तासांमध्ये देशभरात तब्बल ८९ हजार ७०६ नवे करोनाबाधित आढळले असून, १ हजार ११५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ४३ लाख ७० हजार १२९ वर पोहचली आहे.

देशभरातील ४३ लाख ७० हजार १२९ करोनाबाधितांमध्ये ८ लाख ९७ हजार ३९४ अॅक्टिव्ह रुग्ण, डिस्चार्ज मिळालेले ३३ लाख ९८ हजार ८४५ जण व आतापर्यंत मृत्यू झालेले ७३ हजार ८९० जणांच्या संख्येचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

देशभरात ८ सप्टेंबरपर्यंत ५,१८,०४,६७७ नमूने तपासण्यात आले आहेत. यातील ११ लाख ५४ हजार ५४९ नमून्यांची काल तपासणी झाली आहे. आयसीएमआरच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.