कोरोनाचा कहर.. जिल्ह्यात नव्याने तब्बल २७० बाधित रुग्ण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

दिवसेंदिवस जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोना रूग्ण संख्येत प्रचंड वाढ झाली असून मागील चोवीस तासात जिल्ह्यात तब्बल २७० बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर १४ जणांनी कोरोनावर मात केलीय. यात सर्वाधिक रुग्ण हे जळगाव शहर तसेच भुसावळ शहरात आढळून आले आहेत. होम आयसोलेशन केलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या १२६४ इतकी आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी दर ९८. १८% इतका आहे.

असे आढळले बाधित

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण २७० कोरोना रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात ६६, जळगाव ग्रामीण २, भुसावळ १३७, चोपडा ८, पाचोरा १०, भडगाव १, धरणगाव ३, यावल २, एरंडोल ३, जामनेर २, पारोळा १, चाळीसगाव १३, मुक्ताईनगर १४, आणि इतर जिल्ह्यातील ४.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here