जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगावकरांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होतच आहे. जळगाव जिल्ह्यात काल ८८ कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झाले होते, तर आज जिल्ह्यात ८७ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. देशासह महाराष्ट्रात देखील कोरोनाचा उद्रेक वाढतांना दिसून येत आहे.
जळगाव शहरात १६, जळगाव ग्रामीण १, भुसावळ ४०, अमळनेर ५, भडगाव १, धरणगाव १, जामनेर १, पारोळा २, चाळीसगाव ९, मुक्ताईनगर ४, इतर जिल्ह्यातील १ असे एकूण ८७ रुग्ण आढळले आहेत.
जिल्ह्यात सर्वात जास्त कोरोना बाधित रुग्ण जळगाव शहर आणि भुसावळ येथे आढळून येत आहेत. म्हणून सर्व नागरिकांनी शासनाने घालून दिलेली कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे, जेणेकरून आपण कोरोनावर मात करू शकतो.
जळगाव जिल्ह्यात होम आयसोलेशन केलेल्या पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या २८९ आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी दर ९८. १८% आहे.