Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • गोकुळचा सत्तासंघर्ष : सहकाराच्या नावाखाली सत्ताकारणाचा डाव!
    • ‘चित्रपताका’तून लेखक आणि तरुण चित्रपटकर्मींना अभिव्यक्तीची संधी!
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»कोरोनाकहर थांबेना ; देशात आढळले १९ हजार ४५९ नवे रुग्ण
    ताज्या बातम्या

    कोरोनाकहर थांबेना ; देशात आढळले १९ हजार ४५९ नवे रुग्ण

    By June 29, 2020No Comments34 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : देशामध्ये कोरोना विषाणून अक्षरश: थैमान घातले आहे. देशात कोरोना बाधित रूग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मागील २४ तासांत देशभरात तब्बल १९ हजार ४५९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर, ३८० जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ५ लाख ४८ हजार ३१८ वर पोहचली आहे. दरम्यान, भारताने ५ लाख रुग्णांचा आकडा पार केल्यामुळे मोठी रुग्णसंख्या असलेला भारत हा चौथा देश आहे.

    देशभरातील एकूण ५ लाख ४८ हजार ३१८ करोनाबाधितांमध्ये, सध्या उपचार सुरू असलेले २ लाख १० हजार १२० रुग्ण, उपचारानंतर सुट्टी देण्यात आलेले ३ लाख २१ हजार ७२३ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १६ हजार ४७५ जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

    कोरोना विषाणूचा सगळ्यात जास्त परिणाम हा महाराष्ट्र पाहायला मिळतो. राज्यात आतापर्यंत कोरोनाची 5 लाख 48 हजाराहून अधिक प्रकरणं समोर आली आहेत. राज्यांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, रविवारी आत्तापर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत निघाले आणि 24 तासांमध्ये तब्बल 5493 COVID- 19 रुग्णांची वाढ झाली. सलग तिसऱ्या दिवशी 5 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांचा आकडा 1 लाख 64 हजार 626वर गेला. तर आज 156 जणांच्या मृत्यची नोंद झाली. त्यामुळे मृत्यूचा आकडा 7429 वर गेला.

    60 मृत्यू गेल्या 48 तासातले आहेत तर उर्वरित मृत्यू मागील काही काळातले आहेत. राज्यात मृत्यू दर 4.51 टक्के आहे. मुंबईत रुग्णसंख्येने 28 हजारांचा आकडा पार केला आहे.

    कोरोनाच्या रोजच्या आकडेवारीचा अभ्यास केला असता कोरोनाची जवळपास 20 हजार प्रकरणे सलग दुसर्‍या दिवशी समोर आली आहेत. 24 तासांत कोरोनाचे 19,459 नवीन रुग्ण आढळले आणि 380 रुग्ण मरण पावले. देशात कोरोनाची 5 लाख 48 हजार 318 प्रकरणे नोंदली गेली आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

    November 7, 2026

    पारंपरिक चवीला आधुनिक साज देणाऱ्या हटके रेसिपीज

    November 3, 2026

    जळगावमध्ये अवैध धंद्यांचे जाळे फोफावले; जुगार अड्ड्यावर गोळीबाराच्या चर्चेने खळबळ!

    November 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif