जळगाव:- कोरोना संक्रमण आणि लॉकडाऊन काळात छोटे दुकानदार व व्यापारी, त्यांच्याकडे व हॉटेलमध्ये काम करणारे कामगार कमालीचे त्रस्त झाले असताना गावठी दारू काढणारे, ही व देशीदारूची अवैध दारू विक्री करणारे तसेच सट्टापट्टीवाल्यांना ‘अच्छे दिन’ आले. कारण या अवैध दारू विक्री व धंदेवाल्यांनी याच काळात चांगला पैसा कमावला असून, त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष न करता लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे.
कोरोना संक्रमण व लॉकडाऊन काळात दुकानदारांनी त्यांची दुकाने, हॉटेल स्वत:हून दीर्घकाळ बंद ठेवली आहेत. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्याकडे काम करणारे कामगार आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले आहेत. दुसरीकडे, याच काळात शहरात बऱ्याच ठिकाणी अवैध दारू विक्री आणि सट्टापट्टीने उचल घेतली आहे. हा प्रकार भजे गल्ली, शिवाजी नगर, गेंडालाला मिल, तसेच काही शहरातील काना कोपऱ्याच्या भागात नागरिक एकटे ठराविक ठकाणी बसून कोणाला न माहिती पडत रस्त्यावर सट्टा घेत आहे या भागात आजही मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
गावठी दारूभट्ट्या असून, येथील दारू शहरांमध्येही भर दुपारी चोरी छुपे विक्रीसाठी पाठविली जाते. त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांकडे दारू पिणाऱ्यांची ओघ लागलं आहे या काळात पानटपरीवाले, पंक्चर व सायकली दुरुस्त करणारे, दुचाकी मेकॅनिकल, वर्कशॉप, जनरल स्टोअर, रेडिमेड कपड्यांच्या दुकानदारांसह इतर छोटे व्यावसयिक संकटात सापडले आहेत. प्रशासनाने त्यांच्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत सुज्ञ व जाणकार व्यक्तींनी व्यक्त केले