कोरपावलीत अनु जमाती महिला राखीव बिनविरोध

0

यावल ( प्रातिनिधी) : तालुक्यातील कोरपावली ग्राम पंचायतीच्या सार्वत्रीक निवडणूकीसाठी एकुण  सदस्य संख्य अकरा असून त्यासाठी एकुण चार प्रभागातुन ईच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असुन यात प्रभाग क्रमांक दोन मध्ये अनु जमाती महिला साठी राखीव असल्याने प्रभागातुन  हुरमत सिकंदर तडवी यांचा एकमेव अर्ज दाखल असल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चीत मानली जात आहे.

कोरपावली गावात तिस वर्षाच्या इतिहासात पहिल्यानदाच  एक आदिवासी महिला बिनविरोध निवडून येत असल्याने आदीवासी तडवी समाजाने दाखलेली एकता व त्यास इतर समाज बांधवांनी दिलेले पाठबळ हे कोरपावली गावातील ग्राम पंचायत निवडणुकीला सर्वसमावेशक कारभारी यंदाच्या  निवडणुकीत निवडुन येवुन गावाच्या विकासाकडे आपले लक्ष केन्द्रीत करतील अशी अपेक्षा ग्रामस्थांकडुन व्यक्त करण्यात येत आहे.

विजयी मार्गावर असलेल्या ग्राम पंचायत सदस्य हुरमत तडवी यांनी आपले समाज बांधव व संपूर्ण ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले आहे, माधारची वेळ दिनांक ४ जानेवारी २०२१ रोजी होणार असून हुर्मत तडवी यांच्या अधिकृत विजयाचे देखील त्याच दिवसी जाहीर होण्याची शक्यता आहे . सरपंच पदाचे आरक्षण हे अजून लांबणीवर असल्याने  भविष्यात सरपंच पद हे अनु जमाती महिला राखीव निघाल्यास सरपंच पदाची माळ त्यांच्या गळयात पडून प्रथमच कोरपावली ग्रामपंचायतीला एक आदीवासी तरुण वर्गाला मान मिळेल व गावात एक नवीन राजकीय समीकरण तयार होताना दिसून येईल. या निवडणुकीत जवळपास सर्व प्रभागातुन महीला व तरुणांचा मोठा सहभाग हा प्रथमच दिसुन आल्याने तरूण वर्गाकडे जाणार असल्याने यंदाची ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.