कोपरगाव (प्रतिनिधी) कोपरगाव च्या इतिहासात प्रथमच कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर एक गाव एक गणपतीची स्थापना प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे.
परंतु कोपरगाव शहरात अनेक मंडळे हे वर्षोनुवर्षे गणेशोत्सव साजरा करीत आलेले आहेत. त्यापैकीच एक मंडळ म्हणजे सिंधी समाज गणेशोत्सव मंडळ हे मंडळ या वर्षी आपले 48 वे वर्ष साजरा करीत आहे. सतत सामाजिक व धार्मिक देखावे साजरा करून बक्षिसास पात्र ठरणाऱ्या या मंडळाने देखील एक गाव एक गणपती या प्रशासनाच्या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद दिला.परंतु गणपती स्थापना करण्याची परंपरा खंडीत न करता या मंडळाने छोट्याश्या व तुरटीच्या गणपती ची स्थापना मंडळाचे सदस्य मनोहर कृष्णानी यांच्या घरी अगदी धार्मिक वातावरणात केली व परंपरा कायम ठेवली. या मुळे सरकारी आदेशाचे पालन झाले व गणेशाची स्थापना देखील झाली.ही मुर्ती तुरटीची असल्याने पर्यावरण पुरक आहे व कुढेही पर्यवरणा ची हानी होणार नाही याची सुध्दा दखल घेण्यात आली असुन तसेच तुरटी ही पाण्यात लगेच विरघळते तसेच पाण्यातील विषाणुचा याने नाश सुध्दा होतो म्हणुन मुर्तीची विटंबना ही होत नाही,यामुळे अनेकानी या उपक्रमाचे स्वागत देखील केले आहे,
यासाठी मंडळाचे चेतन खुबाणी, रिंकु खुबाणी, हरेश आर्य,हरेश काराचीवाला,विकी शर्मा, अमित शर्मा, राम आर्य,आदींनी पुढाकार घेतला.