कोकण,मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा

0

मुंबई : कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या २४ तासांत अति मुसळधार पाऊस, तर मराठवाड्यात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. नैऋत्य मौसमी वारे सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात सक्रिय आहेत. त्यामुळे या भागात पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. मुंबई, गोव्याच्या डॉपलर रडार प्रतिमा आणि उपग्रह प्रतिमा, कोकण व घाट भागात दाट ढग दर्शवत आहेत. त्यानुसार येत्या २४ तासांत घाट भागात (सातारा, पुणे) अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये, पुणे, सातारा, कोल्हापूर येथील घाट भागांमध्ये गुरुवारपर्यंत आॅरेंज अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. तर रायगडमध्ये बुधवारी पावसाचा जोर थोडा कमी होईल, अशी शक्यता आहे.

मुंबई, ठाणे, पालघर येथेही मंगळवारी आणि बुधवारी मध्यम स्वरूपाच्या, तर गुरुवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, सोमवारी दिवसभर मुंबईत पावसाची संततधार सुरू होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.