मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर लोकसभेच्या जागेचा तिढा न सुटल्यामुळे भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता स्वत: राधाकृष्ण विखे पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत काही आमदारही भाजपामध्ये प्रवेश करतील अशी माहिती आहे.
राधाकृष्ण विखे पाटील राज्यातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशामुळे नगर जिल्ह्यात निश्चित भाजपाला बळ मिळेल तर काँग्रेसला याचा फटका बसेल. नगरमध्ये होणाऱ्या जाहीरसभेत राधाकृष्ण विखे पाटील भाजपामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे. त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांना भाजपाकडून लोकसभेची उमेदवारीही देण्यात आली आहे.