कॉंग्रेसच्या आमदार अदिती सिंह यांच्यावर जीवघेणा हल्ला

0

रायबरेली :- रायबरेलीतील काँग्रेस आमदार अदिती सिंह यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी अदिती यांच्या कारवर तुफान दगडफेक आणि गोळीबार केला. हल्लेखोरांनी त्यांच्या ताफ्यातील गाड्यांचा पाठलाग केला. याचदरम्यान अदिती सिंह यांची कार महामार्गावर पलटी झाली. अदिती यांच्या कारसह त्यांच्या ताफ्यातील तीन गाड्या पलटी झाल्या. यात अदिती जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी लखनौ येथील रुग्णालयात दाखल केले.

रायबरेली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून सोनिया गांधी निवडणूक लढवत आहेत. त्याठिकाणी स्थानिक राजकारण तापू लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी जिल्हा पंचायत अध्यक्ष अवधेश सिंह यांच्याविरोधात अविश्वास ठराव समंत होणार होता. मात्र त्याआधीच काँग्रेस आमदार आदिती सिंह यांच्यावर हल्ला करण्यात आला.

आदितीने अवधेश सिंह यांच्यावर हल्ल्याचा आरोप लावला आहे. अविश्वास ठरावावेळी मतदान करण्याआधी आदिती सिंह लखनऊवरुन रायबरेली येथे जात होत्या. तेव्हा अनेक गाड्या त्यांचा पाठलाग करत होत्या. रायबरेलीनजीक बछरावा टोल प्लाझाजवळ त्यांच्या गाडीवर फायरिंग करण्यात आली. त्यामध्ये आदिती सिंह यांच्या गाडीचा वेग वाढविण्यात आला आणि त्यामुळे गाडी पलटी झाली. यात आदिती सिंह जखमी झाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.