कॉंग्रेसची उमेदवारांची १०वी यादी जाहीर

0

नवी दिल्ली :- १७ व्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षातर्फे २० उमेदवारांची १०वी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये गांधीनगर येथून अमित शाहंच्या विरोधात माजी आमदार डॉ. सी.जे चावडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मंगळवारी रात्री ही यादी उशिरा जाहीर केली . जाहीर केलेल्या यादीत गुजरात, झारखंड, ओडिशा, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, दादरा आणि नगर हवेली आणि पंजाबमधील उमेदवारांचा समावेश आहे. लोकसभेच्या उमेदवारांसोबतच ओडिशातील ९ विधानसभा उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

यंदा ७ एप्रिल ते १९ मे पर्यंत सात टप्प्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडणार असून २३ मेला निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. विद्यमान लोकसभेची मुदत ३ जून २०१९ला संपते आहे. तेव्हा भाजप पुन्हा एकदा लोकसभा जिंकून इतिहास घडवणार की काँग्रेस भाजपला मात देणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.