Saturday, January 28, 2023

कै.सुदाम सोनू महाजन यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिकेचे लोकार्पण

- Advertisement -

 अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कुबेर ग्रुपचे अध्यक्ष, भाजपा शहर उपाध्यक्ष महेंद्र सुदाम महाजन व बंधू संदीप सुदाम महाजन यांचे वडील कै. सुदाम सोनू महाजन यांच्या स्मरणार्थ अमळनेर शहर व ग्रामीण भागातील रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका अद्ययावत करून दिली. माजी आमदार स्मिता वाघ यांच्या सहकार्याने रुग्णवाहिका पुन्हा सुरू करण्यात येत आहे.

माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव भैरवी वाघ पलांडे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण झाले. यावेळी भाऊसाहेब महाजन, साखरलाल महाजन, माजी नगरसेवक विक्रांत पाटील, अनिल महाजन, अमळनेर काच माळी समाज मंडळाचे अध्यक्ष मनोहर भगवान महाजन, सदस्य

- Advertisement -

जगन निंबा महाजन, बाबुलाल राघो महाजन, पांडुरंग नामदेव माळी, गुलाब ओंकार महाजन, मनोहर दयाराम महाजन, अशोक पोपट महाजन, ज्ञानेश्वर शंकर महाजन, सुदाम श्रावण महाजन, रमेश सुदाम महाजन, गणेश पंढरीनाथ महाजन, रविंद्र ओंकार महाजन, गणेश पांडुरंग महाजन, कैलाश गजानन महाजन, राजेंद्र भास्कर महाजन, सुभाष किसन महाजन, देविदास भगवान महाजन तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ईश्वर चौधरी यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कुबेर ग्रुप व सुकेश्वर बहु. संस्थेमार्फत करण्यात येत असलेल्या सामाजिक कामांचे कौतुक केले. महेंद्र महाजन यांच्या दातृत्वामुळे मागील वर्षी देखील एका रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आलेले होते. कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात त्यातून रुग्णांची सेवा करण्यात मदत झालेली होती. अद्ययावत रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार आहे. यावेळी प्रवीण माळी व प्रवीण गुलाब महाजन यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.

यावेळी सुनील महाजन, अँड.रमाकांत महाजन, प्रवीण महाजन, आप्पा महाजन, भाजपाचे राकेश पाटील, देवा लांडगे, पंकज भोई, राहुल चौधरी, भरत सुतार, अनिल महाजन, गणेश महाजन, राजगुरू महाजन, राजू शिंगाने, मांगीलाल शिंगाने, रोशन महाजन, पप्पू महाजन, संदीप महाजन, हेमंत चौधरी, जाकीर मेवाती, प्रकाश शेलकर, गौरव महाजन, जयंत पाटील, मनोज अहिरे, अमोल बडगुजर, फिरोज पठाण, प्रवीण महाजन, हेमराज महाजन, रणजित बाविस्कर, सुमित पाटील, संदीप महाजन, प्रशांत पफिल, प्रभू महाजन, विशाल पाटील, गोकुळ पाटील, आबा महाजन तसेच सुकेश्वर बहु. संस्था व कुबेर ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे