Saturday, October 1, 2022

कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव जिल्हा कारागृहातील कैद्याने जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना कैदीने वार्डात चादरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

भडगाव तालुक्यातील अत्याचाराच्या घटनेत संशयित रविंद्र रमेश निकम (वय २५) हा जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला फिट येण्याचा त्रास होत असल्याने  ११ डिसेंबर रोजी जिल्हा कारागृह प्रशासनाने जिल्हा रुग्णालयातील कैदी वार्डात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या वार्डात आणखी दोन कैदी उपचार घेत आहेत.

मंगळवारी सकाळी इतर दोन कैदी झोपलेले असतांना कैदी रविंद्र निकम याने वार्डातील पंख्याला रूग्णालयातील चादरीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार कैदी वॉर्डाबाहेर गार्ड ड्युटी असलेले पोलिस कर्मचारी हर्षल महाजन व विनय पाटील यांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने त्याला बाजूला केले.

दरम्यान, सदर प्रकार रुग्णालयातील डॉक्टरांना कळविला. त्याला पुढील उपचारार्थ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान रुग्णालयातील कैदी वॉर्डात यापूर्वीही अनेक आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या