जळगाव – जाणता राजा प्रतिष्ठान संचलित, के. के. इंटरनॅशनल (cbsc) स्कुल आण सेमी इंग्रजी शाळा जळगाव. येथे आज 26 जानेवारी रविवार रोजी 71 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी प्राध्यापक श्री.सुरेश पांडे सर के. के. इंटरनॅशनल स्कुलचे चेअरमन श्री. किशोर पाटील, डायरेक्टर सौ.सीमा पाटील, मुख्याध्यापक सौ. वैशाली पंडित, उपप्राचार्य सौ. सुलभा पाटील उपस्थित होत्या .
प्रमुख अतिथी प्राध्यापक श्री.सुरेश पांडे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीताने झेंड्याला मानवंदना देण्यात आली. विद्यार्थ्यांकडून हाऊस पिटी, मास पिटी सादरीकरण करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नाटिका, नृत्य व गाणी सादर केली. प्रमुख अतिथी प्राध्यापक श्री.सुरेश पांडे सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. वंदे मातरम राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
यानंतर प्राध्यापक श्री.सुरेश पांडे सर यांनी शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.