केशवस्मृती प्रतिष्ठानच्यावतीने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे कोविड केअर सेंटर चे उद्घाटन

0

जळगाव (रजनीकांत पाटील):– जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता जळगाव शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी केशवस्मृती प्रतिष्ठानद्वारा छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे कोविड केअर सेंटरचा प्रारंभ आज सकाळी 12 वाजता महापौर भारती सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, आयुक्त सतिश कुळकर्णी, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, बांधकाम व्यावसायिक अनिस शहा, केशवस्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील, संजय बिर्ला, डॉ. धर्मेंद्र पाटील,  नंदू अडवाणी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

कोविड सेंटर मध्ये ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली असून दाखल रुग्णांसाठी योगासन, सात्विक आहार, तद्न्य व प्रशिक्षीत डॉक्टरांचे उपचार, समुपदेशन करण्यात येणार आहे.  डॉ स्वप्निल पाटील व श्री सचिन महाजन हे पूर्णवेळ कोविड सेंटरमध्ये सेवा देणार असून उद्घाटन पूर्वी मान्यवरांनी कोविड सेंटर मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी-सुविधांची पाहणी केली. आयुक्त सतिश कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात केशवस्मृती प्रतिष्ठान समाजातील गरजा ओळखुन त्याप्रश्नांवर सातत्याने काम करत आहे. या कोविड केअर सेंटरचा जळगावकर नागरिकांना निश्चितच फायदा होणार असल्याचे सांगितले.

 

कार्यक्रम यशस्वितेसाठी भानुदास येवलेकर, सागर येवले, भरत शर्मा, तेजस पाठक, हर्षल सुर्यवंशी, विजय पाटील. बापु सोनवणे, रोहन सोनगडा, किशोर गवळी, गोपाळ तगडपल्लेवार यांनी परिश्रम घेतले

Leave A Reply

Your email address will not be published.