Sunday, May 29, 2022

केवायसीच्या नावाखाली ३४ हजारात ऑनलाईन फसवणूक

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत आहे. सीम कार्डचे केवायसी जमा करण्याच्या नावाखाली एका ५५ वर्षीय व्यक्तीला अज्ञात व्यक्तीने मोबाईलवर नियंत्रण मिळवत बँकेतून ऑनलाईन ३४ हजाराची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हरनाम परचामल बठेजा (वय ५५, रा. सिंधी कॉलनी भुसावळ) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २० डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता त्यांना मोबाईलवर अनोळखी नंबरवरून फोन आला. त्यांनी सांगितले की, तुमच्या मोबाईल सीम कार्डचे केवायसीची मुदत संपली आहे. तुम्हाला तुमचा नंबर चालू ठेवण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करून दहा रूपयाचा रिचार्ज करा असे सांगितल्यावर बठेजा यांनी त्याप्रमाणे ॲप डाउनलोड केले.

दरम्यान, अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोबाइलवरील नियंत्रण मिळवत त्यांच्या बँक खात्यातून ऑनलाईन पध्दतीने ३४ हजार २६६ रूपये काढून घेतले. यासंदर्भात हरनाम बठेजा यांनी भुसावळ पोलीसात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि गणेश धुमाळ करीत आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या