केळ्यात अनेक औषधी गुणधर्म असल्याने आरोग्यासाठी केळी चांगली असतात. तज्ज्ञ सुद्धा केळी खाण्यास सांगतात. परंतु, केळीची साल सुद्धा तेवढीच महत्वाची असते, हे खूपच कमी लोकांना माहिती असेल. केळीच्या सालाचे काही उपाय चकित करणारे आहेत. चेहऱ्यासाठी, आरोग्यासाठी, केसांसाठी अशा अनेक समस्यांवर केळीची साल उपयोगी असते.
केळीमध्ये 100 कॅलरी उर्जा असते, ज्यामुळे तुमचे शरीर दिवसभर सफुर्तीवान राहते. याव्यतिरिक्त, त्यात असलेले इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजे देखील शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. केळ्यामध्ये उच्च फायबर असते. म्हणून केळी खाणे फायद्याचे आहे. केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि शरीर निरोगी राहते.
कॅल्शियमचा दररोजचा डोस केवळ हाडांची घनता टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरत नाही तर, त्यांना बळकटी देण्यासही फायदेशीर ठरू शकतो. केळीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅंगनीज, मॅग्नेशियम, लोह, फोलेट, नियासिन, राइबोफ्लेविन आणि बी 6 सारखी जीवनसत्त्वे असतात. पण याबरोबरच इतरही काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.
केळीच्या सालाचा काय आहेत फायदे?
-केळीचं साल खाणं जरा विचित्र आहे. पण केळीचं साल तुमच्या शरीरासाठी फायदेशीर आहे. तुम्ही केळीचं साल कच्चं किंवा शिजवून खाऊ शकता. यामुळे तुमचं वजन कमी होऊ शकतं. केळ्याच्या सालीत सॉल्यूबल आणि इन्सॉल्यूबल असं दोन प्रकारचं फायबर आहे.
-जर तुम्हाला झोप येत नसेल, तर केळीचं साल खावं. केळीच्या सालीत ट्रिप्टोफेन नावाचे एक केमिकल असते. त्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागते.
-तुम्हाला दृष्टिदोषाचा त्रास असेल, तर केळीचं साल खा. केळीच्या सालीत ल्यूटीन असते. जे नजर तीक्ष्ण करण्यास मदत करते.
-टूथपेस्ट संपली असेल किंवा दात पिवळे दिसत असतील, तर केळीचे साल दातांवर घासा. तुम्हाला एका आठवड्यात फरक जाणवेल. पण हो, याचा अर्थ तुम्ही ब्रश करू नका असा होत नाही!
-चेहऱ्यावर मुरुमं किंवा फोडी आल्या असतील, तर केळ्याची साल चोळावी. बाजारात येणाऱ्या कुठल्या तरी क्रिम्स लावण्यापेक्षा केळीच्या सालांचा पर्याय योग्य आहे. केळीच्या सालीत अँटीऑक्सिडंट्स असल्यानं तुमचा चेहरा स्वच्छ आणि तजेलदार होईल.
-केळीच्या सालीचा आतील भाग चेहरा आणि मानेवर घासा आणि अर्ध्या तासानंतर कोमट पाण्यानं धुवा. हे नियमित केल्यानं त्वचेवरील सुरकुत्या कमी होतील.
-केळीच्या सालीमधले पांढरे धागे काढून त्यात अॅलोव्हेरा जेल मिसळा आणि हे डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळांवर लावा. याने डोळ्याखालची काळी वर्तुळं कमी होतील.
-हातापायावर छोटी जखम झाली असल्यास त्यावर केळीची साल लावा. सालीमधील गुणधर्म जखम बरी करण्यास हातभार लावतात.
-उन्हाळ्यात अनेकवेळा पुरळचा त्रास होतो. त्यावर केळीचं साल म्हणजे रामबाण उपाय आहे. तात्काळ नाही पण काही दिवसांमध्ये पुरळ नाहिसे होतील.
-केळीच्या सालीचा वापर नैराश्यातून बाहेर येण्यासाठी फायदेशीर आहे. केळीचं साल पाण्यात उकळून ते पाणी प्यायलात तर तुम्ही तणावातून मुक्त व्हाल. अँटीडिप्रेसमेंट हे मेडिसन नैराश्याच्या आजारात घेतलं जातं. या औषधात असणारे गुणधर्म केळीच्या सालीत आहेत. यामुळे तुमच्या शरीरातील सेरोटोनिनच्या हॉर्मोनची मात्रा वाढते.
– विलासराव असोदेकर