केरळ पूरगस्तांसाठी मंत्री महाजनांच्या नेतृत्वाखाली पथक रवाना

0

शंभर तज्ज्ञांचा पथकात समावेश : केरळवासियांना होणार औषधांचा पुरवठा
जळगाव, दि.20 –
केरळ येथे उद्भवलेल्या भयानक पूर परिस्थितीनंतर नागरिकांना आरोग्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. राज्याचे आरोग्यदूत वैद्यकीय उच्चशिक्षण मंत्री गिरीष महाजन हे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार डॉक्टर, औषधींच्या सुसज्जतेसह सोमवारी सकाळी मुंबईहून केरळला रवाना झाले. त्यांच्यासोबत तब्बल शंभर तज्ज्ञांचे पथक देखील रवाना झाले आहे. केळरवासियांना औषधांचा पुरवठा करुन त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येणार आहे.
केरळ पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आहे. दररोज काही ना काही मदत राज्य सरकारकडून पाठविली जात आहे. पूर ओसरत असताना नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत समस्या बाहेर येवू लागल्या आहेत. आरोग्य सेवेसाठी नेहमी तत्पर असलेले वैद्यकीय उच्चशिक्षण मंत्री गिरीष महाजन हे स्वत: केरळवासियांच्या सेवेसाठी पुढे सरसावले आहे.
100 जणांची सुसज्ज टीम
ना.गिरीश महाजन सोमवारी सुसज्ज वैद्यकीय पथक घेवून मुंबईहून केरळसाठी रवाना झाले. तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित सहाय्यक, मदतनीस आणि स्वयंसेवकांचा समावेश असलेल्या पथकाने वैद्यकीय उपचाराच्या साहित्यासह औषधींचा मुबलक पुरवठा देखील सोबत घेतला आहे.
माणुसकी हेच कर्तव्य
माणुसकी जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. केरळवासी नागरिक आपलेच बांधव आहेत. पूर परिस्थितीनंतर जखमींना मदत देणे आवश्यक असून साथीच्या आजारांना वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. राज्यातील डॉक्टरांच्या सुसज्ज टीमसह मदत पोहचवून शक्य ती मदत महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पोहविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.
– गिरीश महाजन,
मंत्री, जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण

Leave A Reply

Your email address will not be published.